For testing Severe acute respiratory infections Biofire Machine in AIMS 
विदर्भ

कोरोनापेक्षा विदर्भात या आजाराचा कहर; चाचणीसाठी तब्बल 12 हजारांचा खर्च 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात कोरोनापेक्षा "सारी' (सिव्हिअर ऍक्‍युट रेस्पिरेटरी इन्फेक्‍शन्स) आजार भयावह आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या विदर्भात प्रचंड वाढली आहे. नागपुरात कोरोनापेक्षा दुप्पट रुग्ण सारीने दगावले आहेत. यामुळेच शासकीय पातळीवर कोरोनासह सारीची दखल घेण्यात आली. सारीच्या आजारावर उपचार करण्यासाठी आता एम्सने पुढाकार घेतला आहे. बायोफायर फिल्मअरे यंत्र खरेदी केले. या यंत्रावर तत्काळ सारीचे निदान होणार आहे. सारीच्या चाचणीसाठी तब्बल 12 हजार रुपयांचा खर्च येतो. परंतु, अकोला आणि अमरावती येथील विभागीय आयुक्तांकडून एम्सला मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

कोरोनासह सारीच्या नोंदीचे दुहेरी संकट शहरावर घोंगावत आहे. संचारबंदीचा काळ बघता मेडिकल, मेयोसह नागपूरच्या एम्समध्येही सारीच्या रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाची चाचणी अवघ्या अडीच हजारांत होते. मात्र, सारीच्या आजाराचे निदान करण्यासाठी 12 हजार रुपये पडतात. मात्र, हा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. अकोला आणि नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तब्बल 17 लाखांचा निधी एम्सला उपलब्ध करून देण्यात आला. 

बऱ्याच रुग्णांमध्ये जीवाणू-विषाणूचे निदान होत नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेत अद्यायावत बायोफायर फिल्मअरे यंत्र खरेदी केल्याने सारीच्या रुग्णांमधील 18 जीवाणू व 4 विषाणूंचा शोध लावून रुग्णांवर अचूक औषधोपचार शक्‍य होणार आहे, अशी माहिती एम्सच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा (वाजपेयी) यांनी दिली. 

नियंत्रण शक्‍य

 सारीच्या रुग्णांसाठी एम्सच्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या पुढाकारातून बायोफायर फिल्मअरे यंत्र खरेदी केले. या यंत्रावर सारीच्या रुग्णांना कोणत्या जीवाणू व विषाणूंचे संक्रमण आहे, हे अचूक निदान या यंत्राच्या माध्यमातून करता येईल. या अचूक जीवाणू-विषाणूचे निदान होऊन योग्य औषधोपचार झाल्यास हे रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे सारीचे मृत्यू नियंत्रणास मदत होणार असल्याचा दावा एम्सच्या डॉ. मीना मिश्रा (वाजपेयी) यांनी केला. सोबत या यंत्रावर एखादा जीवाणू कोणत्या प्रतिजैविक औषधाला किती प्रतिसाद देत आहे, याचे निदानही हे यंत्र करते. त्यामुळे या यंत्राचा सारीग्रस्तांना लाभ होईल. 

विदर्भात दोन हजार रुग्ण 


विदर्भात सारीचे सुमारे दोन हजार रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय सत्तर मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले. सर्वाधिक सातशेपेक्षा अधिक सारीग्रस्तांची नोंद नागपुरात झाली. इतरही जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. सारीच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. यामुळेच कोरोनाचा आलेख वाढत असल्याचे दिसून येते. सध्या सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी होत आहे. सुमारे पंचेवीसपेक्षा अधिक रुग्णांना कोरोना असल्याचे कोविड चाचणीतून स्पष्ट झाले. सारीच्या बऱ्याच रुग्णांच्या विषाणूचा किंवा जीवाणूचा शोध लागत नसल्याने योग्य उपचाराअभावी मृत्यूही होतो. 


चाचणीचा खर्च आवाक्‍याबाहेर 
एम्समध्ये सारी आजाराच्या एका चाचणीचा खर्च 12 हजार आहे. अकोला विभागातील रुग्णांच्या चाचणीसाठी अकोला विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी 10 तर नागपूर विभागातील रुग्णांच्या चाचणीसाठी नागपूर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी 7 लाख रुपयांची मदत एम्सला केली. अत्यावस्थ सारीग्रस्तांची चाचणी सुरू आहे. या यंत्रावर ज्या रुग्णांकडून औषधांना प्रतिसाद मिळत नाही, व जो रुग्ण अत्यवस्थ गटातील आहे, त्याचीच प्रथमच चाचणी केली जाईल. 
-डॉ. मीना मिश्रा, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, एम्स, नागपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Stomach Bloating: पोटफुगीची समस्या कशी कमी करावी? डॉक्टरांनी सांगितले 5 प्रभावी उपाय

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत

Shubhanshu Shukla : अवकाशात खूप भिती वाटते, पण....गगनयान मिशनबद्दल काय बोलले अंतराळवीर शुभांशू शुक्ला? पाहा व्हिडिओ.

SCROLL FOR NEXT